डोंबिवली (शंकर जाधव)
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत डोंबिवली वाहतूक शाखेच्या आणि ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय डोंबिवली सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने डोंबिवली शहरात वाहतुकीबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली. वाहतूक उपशाखा डोंबिवली कार्यालय येथून रँलीची सूरुवात करून शिवमंदिररोड वरून चार रस्ता मानपाडा रोड नानी पाकँ येथे आणण्यात आली. रँलीद्वारे वाहतुकीचे नियमन व नियम पाळणे बाबत संदेश देण्यात आले. रॅलीत सुमारे शंभर लोकांनी सहभाग घेतला. रॅलीच्या माध्यमातून पोलीस हवालदार आव्हाड यांनी मार्गदर्शन पर भाषण करून वाहतुकीचे नियम समजावून सांगून जनजागृती केली.