डोंबिवली (शंकर जाधव)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बसपा तर्फे युग फौंडेशन संस्थापिका कल्पनाताई किरतकर, युगंधार किरतकर, माधुरी किरतकर यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या धडाक्यात साजरा करण्यात आला. सकाळी पूजन करून महारॅलीचे आयोजन केले होते. यावेळी बसपा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रशांतजी इंगळे, विनोद भालेराव विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बहुजन समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण डोंबिवली शहरात महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बपाच्या महाराष्ट्र नगरमधील कार्यालयापासून रँलीस सुरुवात झाली.
बसपाच्या रँलीत असंख्य कार्यकर्ते निळ्या झेंड्याखाली एकवटले होते. मोटरसायकल, कार तितक्याच रिक्षा महारँलीत सहभागी झाल्या होत्या. पश्चिम येथील फुले रोड, म. गांधी रस्ता, कोपर रोड ओव्हरब्रिज मार्गे पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पुन्हा बसपा कार्यालयात महारॅलीचा समारोप झाला. जयभीमच्या घोषणा देत महारॅलीतल्या कार्यकत्यानी परिसर दणाणून सोडला. ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले तेथे आंबेडकरी जनतेस जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी उपाध्यक्ष सुरेंद्र गौतम, संजय जाधव, दिनेश कानोजिया, राहुल मोरे, रवी मोरे, नागेश कासारे, उमेश पवार, मनोज किरतकर, योगेश तारकर, अतुल सावंत, राकेश राम, संतोष खारवार, कैलास जैस्वार, डुबरी प्रसाद भारती आणी असंख बसपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान येथील युग फाउंडेशनच्या अध्यक्षा कल्पना किरतकर म्हणाल्या, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने तत्कालीन बहुजन पार्टीचे प्रदेश नेते तथा माझे पती स्वर्गीय दयानंद किरतकर यांचा आग्रह आणि हट्ट असायचा की जयंती निमित्त रॅली झालीच पाहिजे. आज त्यांच्या द्वितीय स्मृतिदिन आहे. आजही जयंतीनिमित्त पूर्वीप्रमणेच रॅली होत आहे हा वेगळा आनंद आहे.