29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांचे डोंबिवलीकरांकडून जोरदार स्वागत, गुलाल उधळून नागरिकांचा जल्लोष

कॅबिनेटमंत्री रवींद्र चव्हाण यांचे डोंबिवलीकरांकडून जोरदार स्वागत, गुलाल उधळून नागरिकांचा जल्लोष

डोंबिवली (शंकर जाधव)

शिंदे- फडणवीस सरकारचा ४० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रीपद देण्यात आले. चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीतील जल्लोष करण्यात आला. ढोल-ताश्यांच्या गजरात कार्यकर्त्यानी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वामुळे राजकीय यश मिळाले आहे. कार्यकर्ता, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री अशा क्रमवारीत भाजपाला नेहमीच चढत्या क्रमवारीत सिध्द केले आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री पद मिळवुन रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली शहराच्या शिरपेचात आणखी एक नवा मानाचा तुरा खोवला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होताना डोंबिवलीतील भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांना नक्की कॅबिनेटमंत्रीपद मिळेल अशी खात्री डोंबिवलीकरांना होती आणि झालेही तसेच. चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि डोंबिवलीकरांनी फटाक्यांची आतषबाजी केली. संध्याकाळी साधा कार्यकर्ता आणि अनेकांचा दादा रवींद्र चव्हाण आपल्या दृष्टीपथास कधी मिळेल या प्रश्नांनी अनेकांचे फोन वाजत होते. आणि पाच वाजताच डोंबिवलीच्या सीमेवर कॅबिनेटमंत्रीपद मिळालेला दादा रविंद चव्हाण सर्वांना पहावयास मिळतात गुलालाची उधळण आणि हार, पुष्पहार, गुच्छ देणं सुरू झाले. हजारो डोंबिवलीकर घराडा सर्कल ते श्रीगणपती मंदिर रॅलीत सामील झाले. ढोल-ताशा, बँड वाजंत्री रॅलीत नाचगण्यात दंग झाले होते. दरम्यान टिळकांचा पुतळ्याला पुष्पहार घालून चव्हाणांनी अभिवादन केले. नंतर श्रीगणेशाचे दर्शन घेतले आणि दरम्यान गणेश मंदिर संस्थान तर्फे चव्हाणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक नेते तथा पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिकांनी चव्हाणांचे स्वागत व अभिनंदन केले. यावेळी चव्हाण म्हणाले, विकासाची कामे झाली पाहिजेत यासाठी कार्यरत राहीन, नागरिकांच्या हिताचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडावेन.यावेळी रिपाई डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड , समाधान तायडे यांसह कार्यकर्त्यानी मंत्री चव्हाण यांचे अभिनंदन केले.जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू परब, पूनम पाटील, सुहासिनी राणे, दिनेश जाधव, मनोज पाटील, मुकुंद पेडणेकर, मंदार टावरे, सुजित महाजन, वर्षा परमार, मनीषा छल्लारे, मयुरेश शिर्के, मितेश पेणकार, मिहीर देसाई, हरीश जावकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »