29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
HomeKalyan-Dombivli२५ व्या शोभा यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी.. सिनेकलाकारांचा जल्लोष..

२५ व्या शोभा यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी.. सिनेकलाकारांचा जल्लोष..

डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीत यंदाच्या २५ व्या वर्षीच्या शोभा यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह खासदार डॉ.श्रीकांत शिंदे , सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मनसे आमदार प्रमोद ( राजू) पाटील यांसह सिनेकलाकरांनी सहभाग घेतला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. डोंबिवलीत प्रारंभ झालेल्या या स्वागत यात्रेचे यावर्षी २५ वे वर्ष होते. स्वागत यात्रेत अनेक चित्र रथांसह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. यावेळी पर्यावरणीय रक्षण ,जल अभियान यासारख्या गोष्टींवर चित्र रथात अधिक लक्ष केंद्रित केले होते. वसुदेवम् कुटुंबकम् या संकल्पनेवर आधारित ही स्वागत यात्रा काढण्यात आली. मुख्यमंत्र्यांसह अनेक सिनेकलाकार या यात्रेत सहभागी झाले होते.भाजप माजी नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनी डोंबिवली पश्चिमेला स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले.तर सेफ्टी वेलफेअर असोसिएशनचे विशाल शेटे, भाई पानवडीकर , कैलास सणस, विश्वनाथ शेनोय यांनी स्वागत यात्रेत मान्यवरांचे स्वागत केले.
दरवर्षी प्रमाणेच ढोल ताशा पथकाचा उत्साह शिगेला पोहचला होता. यावेळी जवळपास १५ ते २० पथके यामध्ये सहभागी झाली होती. अनेक पथकांमध्ये लहान मुलांचा देखील सहभाग बघायला मिळला.
पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या तरुणाईचा उत्साह शिगेला पोहचला होता. ढोल ताशाच्या गजरात तरुणाईचे पाय आपसूकच थिरकत होते. इतकेच नव्हे तर सर्वच तरुण सेल्फी काढण्यात दंग झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आठ महिन्यात धाडसी निर्णय घेणारे देशातील हे पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या विकासाबरोबर सांस्कृतिक भूकही पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. याची सुरुवात डोंबिवलीतील झाल्याचा मला अभिमान आहे. फडके रोडवरील गणेश मंदिराचे हे १०० वे वर्ष असून गणपती मंदिरासाठी अपेक्षित असलेली सर्व मदत सरकारकडून केली जाईल असे त्यांनी जाहीर केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, संघाच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून ही शोभ यात्रा सुरू ठेवली आहे. हाच संकल्प पुढील येणाऱ्या पिढीने सुरू ठेवणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले. मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील म्हणाले, यावर्षीचे शोभ यात्रा नियोजनात कमतरता दिसून आली. यावर पुढल्या वर्षी नियोजन योग्य रीतीने करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शोभा यात्रेचे स्वागत करण्यात आले.

सिने अभिनेत्री सायली पाटील आणि आकाश ठोसर सहभागी…

या शोभा यात्रेत आकाश ठोसर आणि सायली पाटील यांनी सहभागी होत ढोल वाजवताना पाहायला मिळाले. तर आकाश ठोसर ढोल वाजवत असताना सायलीने ढोलाच्या तालावर नृत्य केले.

आजोबांनी चालवली काठी लाठी

एका 75 वर्षीय आजोबांनी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकात शोभ यात्रा पोहचताच क्षणी काठी लाठी चलवल्याने सर्वच जण या वयात देखील आजोबांनी केलेल्या प्रात्यक्षिकाचे कौतुक करत होते.

रांगोळ्यांच्या पायघड्या

मंगळवारी सकाळी पाऊस पडल्याने रांगोळ्यांचे काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आज संपूर्ण आकाश निरभ्र असल्याने संस्कार भारतीच्या उमेश पांचाळ यांनी फडके रोड सारख्या अनेक ठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या.

पालिकेचा घनकचरा व्यवस्थापणावर चित्ररथ

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून स्वागत यात्रेत कचरा साक्षरता विषयावर चित्ररथ सहभागी झाले होते.यात उपायुक्त अतुल पाटील, राजेश मोरे, भरत पाटील, वसंत देगलूरकर आदीसह कर्मचारी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »