29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeकरीअरमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुण वर्गाला खुशखबर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पोलीस भरतीसाठी इच्छुक तरुण वर्गाला खुशखबर

राज्यातील साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. रविवारी ते औरंगाबाद दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. औरंगाबाद येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. औरंगाबाद येथील टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनही केले.

हा कार्यक्रम सुरू असतानाच संबंधित परिसरातील काही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबंधित घोषणा का देत आहेत? याबाबत विचारणा केली असता संबंधित तरुण पोलीस भरतीची तयारी करत असल्याचे सांगण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील साडेसात हजार पदांवर लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्याचवेळी गृह विभागाचे सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Chandrapur: वाढदिवसाला स्पार्कल कॅण्डल लावणे पडले महागात, चेहऱ्यावर पडले इतके टाके


विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. शहरातील टी.व्ही सेंटर सोबतच मध्यवर्ती भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि परिसराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »