डोंबिवली (शंकर जाधव)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल राष्ट्रवादी पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी अपशब्द बोलण्याचा आरोप ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने केला आहे. परांजपे यांच्या विरोधात डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा अशी मागणी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे. तर बाळासाहेबांची शिवसेनेचे सह कार्यालय प्रमुख सागर बापट आणि कृष्णा पडीलकर यांनी मानपाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून आनंद परांजपे यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण तालुका प्रमुख आणि जिल्हा समन्वयक महेश पाटील , कल्याण तालुका संघटक अर्जुन पाटील , सचिव तथा कल्याण विधानसभा संघटक बंडू पाटील, सचिव तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, उपशहर प्रमुख गजानन व्यापारी, उपतालुका प्रमुख राहुल गणपुले, युवा सेना डोंबिवली शहर अधिकारी सागर जेधे, कार्यालय प्रमुख प्रकाश माने, उप कार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे, हरीश भोईर , तेजस पाटील , योगेश म्हात्रे , मुकेश भोईर , स्वप्नील वाणी, संदेश पाटील,करण कोतवाल, निखिल साळुंखे आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.