डोंबिवली ( शंकर जाधव ) :- एका कंटेनरने दोन रिक्षांना जोरदार जोरदार धडक दिल्याने दोन्ही रिक्षांचा चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षात प्रवास करणारे तिघे जखमी झाले. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, बाजरपेठ पोलिसांनी याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी सकाळी कल्याण पत्रिपुलावर घडली.
अकबर आणि अमजद शेख अशी जखमींची नावे आहेत. रेबार्स भरलेला एक कंटेनर दुर्गाडीहून निघाला होता.कल्याणच्या पत्री पुलावर हा कंटेनर तुटला. कंटेनरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन रिक्षांना जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील तीन जण जखमी झाले. जखमी प्रवाशांवर कल्याण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.या अपघातात दोन्ही रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच दरम्यान पत्री पुलाजवळ कंटेनरमध्ये अचानक बिघाड झाला. कंटेनर चालक यू-टर्न घेत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन रिक्षांना त्याने धडक दिली. या धडकेत रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.