डोंबिवली ( शंकर जाधव )
दिपावली सणाचे औचित्य आणि दिपावली निमित्त डी.वी. ग्रूप तर्फे रस्त्याच्या कडेवर राहणारे फुगेवाले व काही गोर गरीब आणि गरजूंना चटई, चादर, दिवाळी फराळ आणि जीनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी डी.वी ग्रुप आणि सहकारी मित्र रुपेश नाचरे, नितीश घडशी, जितेंद्र नाचरे, सचिन परदेशी, दत्ता वाठोरे, मिथुन नाचरे, अमोल साळवी, संदेश परब, संदीप चव्हाण, विलास पाटणे, महेश मासये, योगेश अहिरे आदी उपस्थित होते.सामान्य नागरिक दिवाळी साजरी करताना फटाके, दिवाळी फराळ, कंदील,पणत्या घेताना पाहून आर्थिक स्थिती बिकट असलेले मात्र डोळ्यातुन पाणी आणून देवाकडे प्रार्थना करतात.आम्ही ठरवलं की यावर्षी गरिबांबरोबर दिवाळी साजरी करावी.यावेळी मात्र त्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण ते आनंदाचे.यांची आनंदाची दिवाळी साजरी होत असताना पाहून आम्हाला ही आनंद होत असल्याचे डी.वी. ग्रूपने सांगितले.