डोंबिवली (शंकर जाधव) दिपेश म्हात्रे फाउंडेशन प्रस्तुत स्वराज्य दहीकाला महोत्सव २०२२ साजरा होणार असून यात कर्णबधीर मुलांना प्रतीकात्मक दहीहंडी फोडण्याचा मान दिला जाणार आहे. या मुलांना पहिली हंडी फोडताना पाहण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी होणार आहे. कर्णबधीर मुलांना समाजात मान मिळावा या उद्देशाने पहिली दहीहंडी फोडण्यास देणार असल्याचे आयोजक दिपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौक येथे पार पडणाऱ्या या उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंदीय मंत्री कपिल पाटील आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना निमंत्रण देण्यात आला आले. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी या उत्सवात उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले दिल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

दिपेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांनी या उत्सवाचे आयोजन केले आहे. सम्राट चौक येथे साजरा होणाऱ्या दहीकाला उत्सवात पहिली प्रतिकात्मक दहीहंडी फोडण्याचा मान संवाद कर्णबधीर मुलांच्या शाळेतील मुलांना मिळणार आहे. या मुलांना असा मान मिळण्याची हि पहिलीच वेळ असल्याचे शाळेच्या संचालिका सुधा आगाशे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुढे दिपेश म्हात्रे म्हणाले, सम्राट चौकात होणाऱ्या दहीकाला उत्सवात काँक्रीटकरणाच्या रस्त्यावर मॅटिक अस्फाल्ट टाकण्यात आले आहे. लाखो रुपयांची बक्षिसे उत्सवात असल्याने मुंबई व ठाणे जिल्ह्यातील गोविंदा पथक येणार आहे. विशेष म्हणजे या उत्सवात महिलांसाठीहि दहीहंडी लावण्यात येणार आहे. या उत्सवात महाराष्ट्र हास्य जत्रेतील प्रसिद्ध कलाकार, सुप्रसिद्ध गायक उपस्थित राहणार आहेत.