29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी दिपाली सय्यद यांनी साधला भाजपावर निशाणा

दिपाली सय्यद यांनी साधला भाजपावर निशाणा

एकनाथ शिंदेंमुळे (Ekanth Shinde) शिवसेनेमध्ये (Shivsena) राजकीय भूकंप झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्याने चर्चा सुरु झाल्या. एकनाथ शिंदे आमदारांसोबत सुरत मधील हॉटेल मध्ये चर्चा सुरु आहेत. या दरम्यान पक्षाकडून त्याच्या मनधरणीचे पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत. त्या दरम्यान शिवसेना नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत असून आता दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांचे ट्विट आले आहे.

त्यांनी भाजपावर निशाणा साधत शिवसेनेचा वाघ झेपणार नाही अश्या शब्दात सुनावले आहे.
” माननीय एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे. उगाच भाजपाच्या आयटी सेलच्या लिंबू टिंबूंनी सोशल मीडियावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही,” असे दीपाली सय्यद यांनी ट्विट केले आहे. या आधीदेखील दिपाली सय्यद यांनी अशा प्रकारच्या राजकीय ट्विट करून लक्ष वेधले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण कोण आमदार नॉट रिचेबल आहेत ती यादी वाचली का?


विधानपरिषदेच्या निवडणुकीत मविआला भाजपने धक्का दिला असताना एकनाथ शिंदे बेपत्ता झाले.
एकनाथ शिंदे आमदारांसोबत गुजरातमधील सुरत येथे हॉटेलमध्ये असताना हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलीस प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहेत. काही सूत्रांनुसार, एकनाथ शिंदे व आमदार गुजरात भाजपाचे अध्यक्ष सी.आर.पाटील काही नेत्यांच्या संपर्कात आहेत. गुजरातमध्ये पोहोचल्यावर आमदारांनी पाटील यांची भेट घेतली असे देखील सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »