राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) दिल्लीत (Delhi) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला शिंदे गटालाही बोलावण्यात आले होते. शिंदे गटाचे प्रतिनिधी म्हणून दीपक केसरकर दिल्लीला गेले होते. दिल्लीत आल्यावर मीडियाने (Media) शिंदे गटामध्ये असलेल्या केसरकरांना घेरल्यावर त्यांच्याकडून नारायण राणे यांच्या मुलाबद्दल प्रतिक्रिया देण्यात आली.
आणि उद्धव ठाकरे यांचा एवढा पुळका असेल दीपक केसरकरांना तर जाऊन मातोश्रीवर त्यांची भांडी घासा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2022
दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2022
दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2022
दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्या मुलामधील सुरू असलेली बाचाबाची अजूनही थांबलेली नाही. दोघेही एकमेकांवर शाब्दिक वार अद्याप करतच आहेत. भाजप नेते निलेश राणे यांनी केसरकरांची लायकी काढली आणि त्यानंतर केसरकर यांनीही निलेश राणे यांची लायकी काढली आहे. नारायण राणेंची मुलं लहान असून माझ्या पेक्षा अर्ध्या वयाची आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही जर त्यांना वडिलकीचा अधिकार कळत नसेल, हे बोलताना त्यांनी कुणाची लायकी काढू नये.
दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा. pic.twitter.com/LARj8cVLoO
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 13, 2022
त्यांची लायकी काय आहे हे सात वर्षापूर्वी कोकणच्या लोकांनी दाखवून दिले आहे. ते विसरले असतील तर कोकणची जनता त्यांना पुन्हा एकदा त्यांची लायकी दाखवून देईल, असे उद्गगार दीपक केसरकर यांनी निलेश राणे यांच्याबद्दल काढले आहेत. वडीलधाऱ्यांच्या मान राखणे, आदर करणे ही आपली संस्कृती आहे परंतु त्यांची संस्कृती तशी नसावी असे पुढे केसरकर म्हणाले.