तुम्हाला शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला ३ खाती आवश्यक असतात. ही तीन खाती म्हणजे डीमॅट खाते, ट्रेडिंग खाते आणि बँक खाते. प्रत्येक खात्याचे विशिष्ट कार्य असते. पण तिन्ही खाती व्यवहार प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. शेअर बाजारातील व्यवहारासाठी ही तीन खाती आवश्यक आहेत. डिमॅट खाते (Demat Account) हे बँक खात्यासारखेच असते. आपले कष्टाचे पैसे कोणी चोरू नयेत म्हणून आपण बचत खात्यात पैसे ठेवतो. तेथे ते डिजिटल चलनाच्या स्वरूपात राहतात. त्याचप्रमाणे डीमॅट खाते गुंतवणूकदारांसाठी काम करते. डिमॅट किंवा डिमॅट खाते डिजिटल स्वरूपात शेअर्स आणि सिक्युरिटीज ठेवण्यासाठी वापरले जाते. शेअर बाजारात खरेदी केलेले शेअर्स या खात्यात डिजिटल स्वरूपात ठेवले जातात. खरेदी केलेले शेअर्स डिजिटल स्वरूपात ठेवण्याच्या या प्रक्रियेला डीमटेरियलायझेशन म्हणतात. ट्रेडिंग केल्यानंतर हे शेअर्स खात्यात क्रेडिट किंवा डेबिट केले जातात.
गुंतवणूकदारांनी त्यांच्या प्रोफाईलनुसार काळजीपूर्वक डीमॅट खाते उघडावे. भारतातील कोणीही काही मिनिटांत ऑनलाइन डिमॅट खाते उघडू शकतो. गुंतवणूकदार डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) सोबत डीमॅट खाते उघडू शकतात. 5paisa https://bit.ly/3RreGqO वर तुम्ही डिमॅट खाते उघडू शकता आणि सोप्या पद्धतीने व्यापार सुरू करू शकता. डिमॅट खाती चार प्रकारची असतात.
रेग्युलर डीमॅट खाते –
फक्त शेअर्स आणि डिपॉझिट सिक्युरिटीजचा व्यापार करू इच्छिणाऱ्या भारतीय गुंतवणूकदारांसाठी सामान्य डीमॅट खाते असते. जेव्हा तुम्ही शेअर्स विकता तेव्हा ते या खात्यातून डेबिट केले जातील. आणि तुम्ही काही शेअर्स विकत घेतल्यास ते या खात्यात जमा होतील. पण तुम्ही इतर पर्यायांमध्ये ट्रेडिंग करत असाल तर डिमॅट खाते आवश्यक नाही. कारण अशा व्यवहारांना स्टोरेजची गरज नसते.
बेसिक सर्व्हिस डीमॅट खाते –
मार्केट रेग्युलेटर सेबीकडून (SEBI) असे एक नवे अकाऊंट तयार केले आहे. छोट्या गुंतवणूकदारांना डोळ्यासमोर ठेवून हे खाते सुरू करण्यात आले आहे. या खात्यात ५०,००० रुपयांपेक्षा कमी स्टॉक आणि बॉण्ड ठेवण्यासाठी कोणतीही किंमत आकारली जात नाही. पण जर तुमच्याकडे ५० हजार ते २ लाख रुपयांचा स्टॉक किंवा बाँड असेल तर तुम्हाला १०० रुपये शुल्क भरावे लागेल.
Repatriable डीमॅट खाते –
परत करण्यायोग्य डीमॅट खाते अनिवासी भारतीयांसाठी (NRI) आहे. या खात्याद्वारे ते भारतीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकतात. तसेच परदेशातही पैसे ट्रान्सफर करू शकता. तथापि, या प्रकारचे डीमॅट खाते (NRE) अनिवासी बाह्य खात्याशी जोडणे अनिवार्य आहे.
Non-repatriable डिमॅट खाते –
अनिवासी भारतीयांसाठी नॉन-रिपेट्रिएबल डिमॅट खाते देखील उपलब्ध आहे. पण या खात्यातून परदेशात पैसे ट्रान्सफर करता येत नाहीत.
डीमॅट खात्याचे फायदे
भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे. डिमॅट खाते उघडण्याचे अनेक फायदे आहेत. डिमॅट खाते शेअर्सचे हस्तांतरण जलद करते. डिमॅट खात्यात असलेले शेअर्स किंवा इतर प्रमाणपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात. त्यामुळे शेअर्स चोरीला जाण्याची किंवा हरवण्याची भीती नसते. डीमॅट खाते पूर्णपणे सुरक्षित आहे कारण ते ऑनलाइन आहे आणि तुम्ही ते कधीही, कुठेही ऑपरेट करू शकता. बोनस स्टॉक, स्प्लिट शेअर्स आपोआप खात्यात जमा होतात.
डिमॅट खाते कसे उघडायचे?
भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे. तुम्ही कोणत्याही ब्रोकर किंवा वित्तीय संस्थेमार्फत डीमॅट खाते उघडू शकता. डिमॅट खाते उघडण्यासाठी, प्रथम तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) निवडावा लागेल. तुमचा डीपी म्हणून कोणतीही वित्तीय संस्था, अधिकृत बँक किंवा ब्रोकर निवडून तुम्ही डिमॅट खाते उघडू शकता. डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) ब्रोकरेज (शुल्क), वार्षिक फी आणि लीव्हरेजच्या आधारावर निवडला जावा. डीपी निवडल्यानंतर, डीपी वेबसाइटवर जा आणि ऑनलाइन डीमॅट खाते उघडण्याचा फॉर्म भरा. त्यानंतर केवायसी फॉर्म देखील भरा. यासोबत तुम्हाला काही कागदपत्रे जमा करावी लागतील. त्यांना पॅनकार्ड, वास्तव्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो द्यावा लागेल. पडताळणी प्रक्रियेदरम्यान सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवा. त्यानंतर तुम्हाला बँकेचे तपशील देणारा रद्द केलेला चेक देखील द्यावा लागेल.
पडताळणी प्रक्रियेनंतर तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपंटसोबत करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले जाईल. हा करार डिपॉझिटरी सहभागी आणि गुंतवणूकदार यांच्या सर्व जबाबदाऱ्या आणि अधिकार निर्धारित करतो. ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतर स्वाक्षरी करा. आजकाल अनेक प्लॅटफॉर्म ऑनलाइन डिमॅट खाते उघडण्याची सुविधा देतात. या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमचे डिमॅट खाते उघडू शकता.