डोंबिवली (शंकर जाधव)
शेवंताबाई मुंडे प्रतिष्ठान आगासन दिवा स्टेशन व आपले शहर वृत्तवाहिनी व साप्ताहिक शरनामा वूत्तपत्र यांच्यावतीने गोरगरीब आदिवासी बांधवांना ब्लॅन्केट चे वाटप करण्यात आले. मुरबाड मधील पवाळे गावातील आदिवासी वस्तीत गोरगरीब आदिवासी बांधव व अपंग बांधवांना शेवंताबाई मुंडे प्रतिष्ठान यांच्यावतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. शेवंताबाई मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावेळी प्रतिष्ठान च्या कार्याचे कौतुक करीत मान्यवरांचे नागरिकांनी सन्मान केला.
कार्यकारी अभियंत्यासह दहा जणांच्या पथकाला मारहाण, एकाला अटक
यावेळी प्रतिष्ठानचे नरेश मुंडे ,सुमित भोईर, यश पाटील, प्रतीक पाटील, कैलास भोईर यशवंत विशे.चंद्रकांत म्हात्रे , बाला आयरेकर ,जगदीश घोरपडे रमेश रायकर, ग्रामपंचायत पवाळे सरपंच दिपक घरत,
उपसरपंच सुधीर पवार ,ग्रामपंचायत सदस्या शारदाबाई पवार,पवाळे सोसायटीचे चेअरमन एकनाथ पवार,
आपले शहर वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी गितेश पवार, तुळशीदास पतंगराव, बाळकृष्ण पवार, सोमनाथ पवार,रमेश पवार, रवींद्र पवार, दीपक पवार, वैभव पवार, विकी पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.