डोंबिवली (शंकर जाधव) भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पाश्वर्भूमीवर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घर घर तिरंगा
उपक्रमात राज्यातील प्रत्येक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी भाजप डोंबिवली महिला मोर्चा पूर्व मंडळाच्या वतीने नागरिकांना, दुकानदारांना व मंदिरांमध्ये तिरंगा देण्यात आले. राष्ट्रध्वजाचा मान-सन्मान राखून आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभाग होऊ या असे म्हणत महिला पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली पूर्वेकडील गणपती मंदिरापासून या उपक्रमाला सुरुवात केली. यावेळी महिला आघाडी अध्यक्षा पूनम पाटील यांसह मनीषा छल्लारे, अमृता जोशी, हेमलता संत, वर्षा परमार, प्रतीक्षा पवार, माधवी दामले आणि वंदना गोडबोले नागरिकांना तिरंगा देत घर घर तिरंगा
उपक्रमात सहभागी होण्याची विनंती केली.