नुकत्याच निवडणुका तोंडावर येत असल्याने अनेक शहरांमध्ये विकासाची खोळंबलेली कामे असतील, तसेच काही बांधकामे असतील या कामांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिकडे तिकडे शुभारंभ होण्यास गती दिसत आहे.
त्यातच आज डोंबिवलीतील काही मध्यवर्ती ठिकाणी, तसेच लोकवस्ती ठिकाणी सोई सुविधेच्या कामांना सुरुवात झाली आहे.
डोंबिवली (Dombivali) शहर म्हंटलं की आपल्याला रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची गर्दी दिसते , एक विकसित शहर म्हणून डोंबिवलीची ओळख आहे, मुंबई पासून काही अंतरावर असलेलं डोंबिवली हे लोकसंख्येने गजबजलेलं शहर आहे. जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेन्ट सुरु आहेत, मोठमोठ्या शहरांपैकी डोंबिवली झपाट्याने विकसित झालेलं शहर आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधकाम वाढल्याने लोकसंख्या वाढली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर डोंबिवली शहरात ” दिनांक 8-5-2022 रोजी आमदार “श्री रवींद्र चव्हाण, यांच्या आमदार निधीतून नगरसेवक श्री प्रकाश गोपीनाथ भोईर, नगरसेविका सौ सरोज प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नाने विभागातील रेतीबंदर रोड, हेंद्र्या आर्केड, शांताराम स्मुर्ती, गणपत सुखीर या ठिकाणी पायवाट व गटारे बांधकामांचा शुभारंभ करण्यात आला.


या प्रसंगी आमदार “श्री रवींद्र चव्हाण, नगरसेवक प्रकाश भोईर, नगरसेविका सौं सरोज प्रकाश भोईर यांच्या समवेत विभाग अध्यक्ष श्रीकांत वारंगे, उपविभाग अध्यक्ष सुरेश मुणगेकर, संदीप म्हात्रे, विद्यार्थी सेना शहर सचिव प्रितेश म्हामुणकर, उपशहर अध्यक्ष परेश भोईर, शाखा अध्यक्ष नितीन दीपनाईक, जीत भोईर, गरुड म्हात्रे, महिला पदाधिकारी सुषमा वालिपकर, भाजपचे कैलास म्हात्रे आणि अनेक महाराष्ट्र सैनिक इत्यादी समाजसेवक जनसेवक यांनी उपस्थित राहून पायवाट व गटारे बांधकाम या विकास कामांचा शुभारंभ केला.