आज सकाळी डोंबिवली (Dombivali) पूर्व येथील चामुंडा उद्यानाजवळ पावणे दहाच्या सुमारास ९० फीट रोडवर (90 Feet Road) अचानक एका चारचाकी (Four Wheeler) वाहनाला आग लागली. त्यामुळे पूर्ण परिसरात खळबळ उडाली. तेथील अनेक नागरिकांनी ती आग विझवण्याचे प्रयत्न केले. काही वेळाने अग्निशमक दलाने येऊन आग पुर्णपणे विझवली. सुदैवाने त्या परिसरातील नागरिकांना कोणतीही जीवित हानी झाली नाही.
चारचाकी वाहनाचे मालक अभिजित खाडे यांनी त्याची गाडी (MH ०२ DN ७८७९) चामुंडा उद्यानाजवळ पार्क केली होती. सकाळी जिम मधून बाहेर पडले व आपल्या गाडीत बसले तेवढ्यात गाडीत अचानक स्पार्क झाला म्हणून ते लगेच गाडीतून बाहेर पडले आणि गाडीला आग लागली. आग लागल्याचे पाहताच अभिजित खाडे व नागरिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न करत अग्निशमक दलाला संपर्क केला. अग्निशमक दलाचा बंब येऊन त्यांनी आग पूर्ण विझवली.