डोंबिवली (शंकर जाधव)
बॉयलर भट्टीमधील वायू व कोळसा अंगावर उडून भाजल्याने सहा कामगार जखमी झाल्याची घटना २४ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसीमधील जय इंडस्ट्रीज कंपनीत घडली.या प्रकरणी कंपनी प्रशासवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवार २४ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसीमधील जय इंडस्ट्रीज कंपनीत सहा कामगारांवर वायू व कोळसा अंगावर उडून भाजल्याने सहा कामगार जखमी झाले.
जखमी कर्मचाऱ्यांवर डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी निष्काळजीपणा ठपका ठेवत जय इंडस्ट्रीज कंपनी प्रशासनाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील जय इंडस्ट्रीज केमिकल कंपनीमध्ये काल सकाळच्या सुमारास कामगार काम करत होते. कंपनीच्या बॉयलर विभागात बॉयलर भट्टी मधील वायू व कोळसा कामगारांच्या अंगावर उडाला.
या दुर्घटनेत काम करत असलेले सहा कामगार जखमी झाले. या कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी अपघात होऊ नये यासाठी पुरेसे काळजी न घेतल्याने तसेच कंपनी प्रशासनाकडून केलेला निष्काळजपणामुळे सदरची घटना घडल्याचा ठपका ठेवत जय इंडस्ट्रीज कंपनी प्रशासना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.