डोंबिवली (शंकर जाधव)
भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी गौरव गौतम यांची गुरुवारी १३ तारखेला कल्याण जिल्हा दौरा व युवा मोर्चा बैठक होणार आहे. डोंबिवली पूर्वेकडील भाजप मंडळ कार्यालयात दुपारी १२ ही बैठक होणार असल्याची माहिती भाजयुमो डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर यांनी दिली. यावेळी भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.