डोंबिवली (शंकर जाधव) दहीकाला उत्सव साजरा करताना गोविंदा पथक थरावर थर रचत उंच हंडी फोडतात.डोंबिवलीतील क्षितिज संचालित क्षितिज गतिमंद मुलांच्या शाळेच्या आवारात या मुलांनी पावसाचा आनंद लुटत शिक्षकांच्या मदतीने हंडी फोडली.
डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडीतील क्षितिज संचालित क्षितिज गतिमंद मुलांच्या शाळेच्या आवारात दहीहंडी बांधण्यात आली होती. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अनिता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी उत्सव करण्यात आला. दरम्यान पावसाचा आनंद घेत हंडी फोडली. यावेळी संस्थेच्या माधुरी म्हामुणकर, लक्ष्मी रंगनाथन, रजनी कदम, प्राची गडकरी, प्रभारी मुख्याध्यापिका सुरेखा गायकवाड, शिक्षिका शीतल सुर्यवंशी, अनुसया गुरव, विजया शिंदे, बाळासाहेब ढगे, आशिष पाटील, दीपक साळुंके, शिक्षकेतर कर्मचारी मीना शेलार, लता केणे उपस्थित होते.
यावेळी क्षितिजच्या गतिमंद मुलांनी गोविंदा आला रे आला ‘जरा मटकी सांभाल ब्रिजबाला’ असे म्हणत गोविंदाची साखळी करून दोन थर लाऊन हंडी फोडली. शाळेतील शिक्षकांनी मुलांना आधार देत हंडी फोडली. त्यावेळी त्यांना मिळालेला आनंद खूप लक्षवेधी होता.
आदर्श म्हस्के, आदित्य अय्यर, यशराज कारंडे, सूरज साळवी यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी हंडी फोडण्यात सहभाग घेतला.