डोंबिवली (शंकर जाधव)
बोधिसत्व प्रबोधन चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मॅरेथॉन अस्खलित वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन स्पर्धेचा एक अभिनव विषय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून संसदेत केलेल्या भाषणाचे वाचन या स्पर्धेत केले जाणार आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांनी या स्पर्धेत शुद्ध मराठी भाषेत अस्खलित वाचन करणाऱ्या प्रथम विजेत्या स्पर्धकाला ५० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.
कुत्र्यापासून वाचण्यासाठी डिलीव्हरी बॉयने उचलले धक्कादायक पाऊल, उपचारादरम्यान मृत्यु
बोधिसत्व प्रबोधन चरीटेबल ट्रस्टच्या तर्फ संस्थेचे अध्यक्ष जी. टी. शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी केशव भोईर, एम. एन. ढोकळे, भास्कर पंचांगे, अनिलकुमार मोरे आदी उपस्थित होते.यावेळी शिंदे यांनी सांगितले की, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतानाच भारतरत्न डॉ आंबेडकर यांनी संसदेत केलेले पहिले भाषण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावे या उद्देशाने अस्खलित मराठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. स्पर्धेत १८ वर्षावरील मराठी अस्खलित वाचता येणाऱ्या स्पर्धकांनाच प्रवेश दिला मिळेल. प्रत्येक महाविद्यालय स्तरावर तसेच संस्थाच्या स्तरावर हा उप्रकम पहिल्या टप्प्यात राबविला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या पहिल्या तीन स्पर्धकाची निवड होईल. त्यानंतर उत्कृष्ट स्पर्धकांची जिल्हा स्तरीय वाचन स्पर्धेसाठी निवड होईल आणि अंतिम फेरीसाठी २८ स्पर्धक निवडले जातील.
इमारतीमधील घराला लागलेल्या आगीत आजी आणि नातू लेकीचा मृत्यू
प्रत्येक स्पर्धकाला भाषणाची प्रत पुरविली जाणार असून या भाषणाचे २८ भाग करण्यात आले आहेत. प्रत्येकाला त्यातील एकाच भागाचे वाचन करायाचे आहे. शास्त्रशुद्ध भाषेत वाचतानाच स्पर्धकाच्या चेहऱ्यावरील हावभाव, वाचनातील चढउतार यासारखे निकष परीक्षकाकडून तपासले जातील. स्पर्धेच्या प्रथम विजेत्या स्पर्धकाला ५० हजार, द्वितीय विजेत्यास २० हजार तर तृतीय विजेत्यास १० हजार रुपयाचे पारितोषिक दिले जाणार आहे असेही शिंदे यांनी सांगितले. वाचन प्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ३१ जानेवारी २०२३ पर्यत संस्थेच्या कार्यालयात नांवे नोंदवून स्पर्धेचे ठिकाण आणि वेळ याची माहिती घ्यावी असे आवाहन बोधिसत्व प्रबोधन चरीटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी टी शिंदे : ९९६७८६६७३६, अनिलकुमार मोरे : ८४२५०८६९३०, विशुद्धी शिंदे-नवरे : ९९२०११२००३ या क्रमांकाकावर संपर्क साधावा.