डोंबिवली ( शंकर जाधव ) स्टेशन बाहेरील परिसरातील १०० मीटर अंतरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. शहरात मंत्री, आमदार , खासदार आणि पालिका आयुक्तांचा शहरात पाहणी दौरा असल्यास स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त होतो असे बोलले जाते.दोन दिवसांपूर्वी पालिका आयुक्त डोंबिवलीत येणार असल्याने पालिका अधिकारी व कर्मचारी जागे झाले.गुरुवारी डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाल्यांना हटवण्यात आले.तर डोंबिवली पश्चिमेकडील दुकानांचे अनधिकृत शेड तोडण्यात आले.
डोंबिवली पश्चिमेकडील ‘ह’ प्रभाग क्षेत्र सहायक आयुक्त रोकडे, पथक प्रमुख विजय भोईर, अधीक्षक अरुण पाटील यांसह कर्मचारी यांनी दुकानांच्या अनधिकृत शेड तोडले.तर ठाकुरवाडीतील कार पार्किंग शेडही तोडण्यात आले. डोंबिवली पश्चिमेकडे स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त असल्याने यापूर्वी प्रभाग समितीची सभेत कौतुक करण्यात आले होते.
दरम्यान, दुकानदारांनी फुटपाथवर अतिक्रमण केले असून अद्याप पालिका प्रशासनांकडून फुटपाथ नागरिकांना चालण्यास मोकळे करू शकले नाही. ज्ञानेश्वर मंगल कार्यालयाच्या बाजूकडील फुटपाथवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण झाले आहे.या फुटपाथवर तर चक्क दुकाने उभी राहिली असून यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.