डोंबिवली (शंकर जाधव)
पायी चालण्यास राखीव असलेल्या फुटपाथवर दुकानदार आणि फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालत जावे लागते. स्टेशनबाहेरील फुटपाथचा ताबा दुकानदार व फेरीवाल्यांनी घेतल्याने नागरिकांच्या तक्रारीकडे पालिकेने लक्ष दिले. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करताना नागरिकांना चालण्यास फुटपाथ मोकळे करण्यात आले. ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त भरत पाटील, संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख अरुण जगताप, मिलिंद गायकवाड, राजेंद्र साळुंखे यांसह पथकांनी कारवाई केली.