डोंबिवली (शंकर जाधव)
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवीनिमित्त डोंबिवली मनसेने काढलेल्या तिरंगा रॅलीत महापुरुषांची वेशभूषा
करून लहान मुले सहभागी झाली होती. यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वेष परिधान करून शांतीचा संदेश दिला.


डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून रॅलीला सुरुवात झाली. फडके रोड मार्गे स्वर्गीय आप्पा दातार चौक, गणपती मंदिराजवळ रॅलीची सांगता झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डोंबिवली शहराच्या वतीने स्व. आप्पा दातार चौक येथे ध्वजारोहण करण्यात येईल. रॅलीत मनसे जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत, राहुल कामत, अरुण जांभाळे, संदीप (रमा) म्हात्रे, श्रीकांत वारंगे, दीपिका पेंढणेकर, माजी नगरसेविका कोमल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.