डोंबिवली (शंकर जाधव) भोपर गावातील व्यायामशाळेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी ऍड ब्रम्हा माळी यांना मारहाण झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाला आहे. ही घटना व्यायामशाळेतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी ऍड ब्रह्मा माळी हे व्यायामशाळेत व्यायाम करत असताना भाजपचे कुंदन माळी यांसह दोन ते तीन सहकाऱ्यांनी अचानक आले. ऍड ब्रम्हा माळी यांच्या अंगावर तीन ते चार जण आले. ऍड ब्रम्हा माळी यांनी आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी ऍड ब्रम्हा माळी यांना मारहाण झाली. व्यायामशाळेतील हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणी ऍड. ब्रम्हा माळी यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जमा झाले होते. तर मॉर्निंग वाँकला जात असताना ऍड ब्रम्हा माळी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपचे कुंदन माळी यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत लिहिले आहे.
याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ऍड. ब्रह्मा माळी यांच्या फिर्यादीवरून कुंदन माळी , नितेश सावकार , विनेश माळी,आणि मुकेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर कुंदन माळी यांच्या फिर्यादीवरून ऍड ब्रह्मा माळी, रमेश पाटील, दिलकुश माळी आणि पांडुरंग पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.