31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी ते खड्डे नव्हे तर विहिरच... डोंबिवलीतील रस्त्यावर पडलेल्या खड्डड्यावरून प्रशासनाला टोला

ते खड्डे नव्हे तर विहिरच… डोंबिवलीतील रस्त्यावर पडलेल्या खड्डड्यावरून प्रशासनाला टोला

डोंबिवली (शंकर जाधव)

डोंबिवली शहरातील खड्ड्यावरून पालिका प्रशासनाला धारेवर धरत हे खड्डे नव्हे या तर विहिरी आहेत असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पालिका प्रशासनाला लगावला. पालिका आयुक्तांनाही सुनावत ते शासनाकडून आले आहे, ते काही आपले जावई नाही असेही चव्हाण यांनी सांगितले. डोंबिवलीतील ब्लॉसम इंटरनशनल स्कूलने तयार केलेल्या अद्ययावत ऑडीटोरीयमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मंत्री चव्हाण पुढे म्हणाले, शहरातील कचरा उचलला जात नसताना उपविधी कर वसूल केला जातो यासाठी आपण विरोध केला तरी ऐकले जात नाहीत असे स्पष्ट करताना त्यांनी अधिकाऱ्याला किती अधिकार दिले पाहिजेत हे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा थेट आरोप करताना मंत्री चव्हाण म्हणाले, रखडलेले सुतीकागृह, रखडलेल्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण, ६ वर्षापासून सुरु असलेला माणकोली पूल आणि ८ वर्षापासून सुरु असलेला कल्याण शिळ रोड यासारख्या प्रकल्पाकडे लक्ष वेधले. गडकरी एका दिवसात २८ किमीचा रस्ता तयार करतात आणि ८ वर्षे कल्याण शिळ रोड तयार होत नाही ही जबाबदारी कोणाची असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच केला. तर कल्याण शिळ रोड वरील खड्ड्याची जबाबदारी आपली नसून कल्याण शिळरोडवर अडचणी आता ही आहेत आणि भविष्यात देखील राहणार असल्याचे सांगितले. राज्यात भाजपची सत्ता असताना डोंबिवली शहरासाठी ४७२ कोटीचे रस्ते मंजूर करून घेत या रस्त्याचा डीपीआर तयार करत निविदा देखील काढल्या होत्या. मात्र त्यानंतर सरकार गेल्याने नंतरच्या सरकारमधल्या कोणाला तरी दुर्बुद्धी सुचली कोणाला ते माहित आहे. पण वित्तीय मान्यता असलेला निधी रद्द करण्यात आला. ज्यांनी कोणी रद्द केला त्यांचीच हा निधी पुन्हा मंजूर करण्याची जबाबदारी असल्याचे सांगत पहिल्यादा खोडले ते पुन्हा मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यामुळेच त्यावेळी केलेले पाप आता धुवून टाका असा उपहासात्मक सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »