डोंबिवली ( शंकर जाधव ) मनसे आणि शरद पवारांमध्ये शाब्दिक युध्द झाल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधत हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले लोक विधीमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं?”, अशा शब्दात खोचक टोला लगावला होता. याला मनसे नेते तथा आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. `आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल, आम्ही “धन”से कमी आहोत पण “मन”से लई आहोत, मौका सबको मिलता है, आदर देतोय आदर घ्या असे उत्तर दिले.