स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘घर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांर्गत कल्याण डोंबिवली शहरातील शासकीय इमारती, महापुरुषांचे पुतळे, पत्रीपूल याठिकाणी विद्युत रोषणाई करण्याची मागणी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसी आयुक्तांनकडे केली होती. याला मान्यता दिल्याने डोंबिवली स्टेशन परिसरातील पादचारी पुलाला आकर्षक अशी विद्युत रोषणाईने करण्यात आली. रोषणाई पाहण्यासाठी आलेल्या डोंबिवलीकरांनी देखील याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचे यावेळी माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.