डोंबिवली ( शंकर जाधव ) सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात खड्ड्यांवरून थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. यावर शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाने आरोप न करता काम करा असा सल्ला दिला. तर शिवसेनेने यावर उत्तर देताना ठाणे शहराच्या विकास होऊ शकतो ते १३ वर्ष उलटूनही येथील आमदार चव्हाण हे डोंबिवली शहराचा विकास का करू शकले नाहीत असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
ठाणे येथील स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून केलेली योजना, क्लटर योजना आणि रस्ते यावर इतकी वर्ष टीका होत नाही. कारण येथील विकास ठाणेकरांना पसंत पडला आहे.ठाणे शहर हे विकासाबाबत अग्रेसर असून येथील आमदार, लोकप्रतिनिधींनी ठाणे शहराचा प्रशासनाकडे सतत केलेल्या पाठपुराव्याने हे उल्लेखनीय असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी शिवसेना मध्यवर्ती शाखेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे शहराचा केलेल्या पाठपुराव्याला यश आले असताना शिवसेनेकडून अप्रत्यक्षपणे कौतुक करण्यात आले. तर भाजपशी युती करून इतकी वर्ष सत्ता भोगल्यानंतर आता शिवसेनेने भाजपवर विकासावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
ससार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी डोंबिवली शहराकडे इतकी वर्ष लक्ष न दिल्याने आज हे शहर बकाल झाल्याचा आरोप शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख थरवळ यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, विधानसभा संघटक तात्या माने, कल्याण-डोंबिवली महानगर संघटक वैशाली राणे-दरेकर, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक कविता गावंड,डोंबिवली शहर संघटक किरण मोंडकर, मंगला सुळे, शहर कार्यालयप्रमुख सतीश मोडक, उपशहर प्रमुख अरविंद बिरमोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
४७२ कोटी रुपये डोंबिवलीच्या विकासासाठी मंजूर झाले असे मत्री चव्हाण म्हणत असतील तर त्यांनी विधानसभेत लक्षवेधी का नाही मांडली असा प्रश्न जिल्हाप्रमुख थरवळ यांनी उपस्थित केला.चव्हाण यांनी अधिकारी एेकत नाही असे म्हणणे कितपत योग्य आहे असा प्रश्नही डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी उपस्थित केला. डोंबिवली शहर संघटक मंगला सुळे यांनी डोंबिवली शहराच्या विकासाकडे मंत्री चव्हाण यांचे लक्ष नसल्याचे सांगितले. दरम्यान डोंबिवलीकर जागरूक झाले असून एकमेकांवर आरोप करत असल्याचे जनतेला दिसत असल्याचे सांगण्यात आले.