राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना २१ एप्रिलपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज केली. ज्या शाळांचा अभ्यासक्रम सुरू त्यांनी सकाळच्या सत्रात आपले अभ्यासक्रम उरकण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात आधीच जाहीर केल्याप्रमाणे, उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून आणि विदर्भात ३० जूनपासून शाळा सुरू होतील, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.
ज्या शाळांमध्ये प्री-स्कूल क्लासेस आहेत किंवा उपक्रम आहेत त्यांनी ते सकाळच्या सत्रात करावेत, दुपारच्या सत्रात नाही. नववी-दहावी सोडून इतर वर्गातील मुलांना बोलावता येणार नाही, त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा भार पडू नये आणि इतर कोणताही अभ्यास कार्यक्रम देऊ नये, असेही केसरकर म्हणाले. दहावी सोडून इतर सर्व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद मुलांनी घ्यावा, उन्हाळा खूप वाढतोय, त्यामुळे या काळात आणखी काही शिकायचे असेल तर काळजी घ्यावी, असे आवाहन केसरकर यांनी केले.
नवी मुंबईत काही दिवसांपूर्वी खारघर येथे उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे, विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा तडाखा बसत असताना, या घटनेची गंभीर दखल घेत शालेय शिक्षणमंत्र्यांनी आज उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे.