मोहित सुरी (Mohit Suri) दिग्दर्शित ‘एक व्हिलन’ (Ek Villain) जो २०१४ साली प्रदर्शित झाला होता त्याचा दुसरा भाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तुम्हाला कदाचित वाटलं असेल कथा संपली ,पण ८ वर्षानंतर ‘एक व्हिलन रिटर्न्स’ (Ek Villain Returns) ने नवीन कथेला सुरुवात केली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रद्धा कपूर,सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख हे अभिनेते दिसले होते तर आता नवीन चित्रपटात म्हणजेच दुसऱ्या भागात जॉन अब्राहाम, दिशा पटानी,अर्जुन कपूर आणि तारा सुतारीया हे अभिनेते दिसणार आहेत.
या चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त आहे. बऱ्याच दिवसांनी सस्पेन्सने भरलेली कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे हे निश्चित आहे. चित्रपटात खलनायक कोण हे ट्रेलरमधून कळाले नसून तो देखील एक मोठा सस्पेन्स असणार आहे. पण हे अगदी निश्चित आहे कि कथा अगदी ताजी असून या वेळी जो खलनायक आहे त्याने आपले लक्ष्य फक्त एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलींवर आहे.
२०१४ साली रिलीज झालेला एक व्हिलन बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालून गेला होता आता एक व्हिलन रिटर्न्सचा बॉक्स ऑफिस वर किती परिणाम होतो हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरेल.