महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करत ट्विट (Tweet) केले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेत असल्याचं म्हटलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी फसवणूक नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….
गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk
एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो आहे. “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन” असे ट्विटमध्ये लिहिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसह बंडखोरी केली आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची संघटना बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेत असल्याचा युक्तिवाद करत आहेत.