परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. हाताशी आलेला घास धुळीत गेला. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अशा स्थितीत सरकारी मदत कधी मिळणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी 964 कोटींची कर्जमाफी केल्याची घोषणा केली आहे. 7 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
Raj Thackrey : राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंना पत्राद्वारे ‘ही’ विनंती