शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेत (Shivsena) गोंधळ उडाला आहे. अहवालानुसार एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमधील (Gujrat) सुरत येथे ११ पेक्षा जास्त आमदारांसोबत एका हॉटेलमध्ये आहेत. ते गुजरात मध्ये असल्याने अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. त्याच पार्शभूमी दुपारी एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे गुजरातमध्ये असून भाजपच्या नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे. शिवसेना सत्ताधारी उद्धव ठाकरे शिंदेंना सतत कॉल करत आहेत परंतु त्यांचा फोन नॉट रिचेबल लागत असल्याने ठाकरेंची धाकधूक वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी जर शिवसेनेला रामराम केला तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ झालेली दिसून येतेय.
आज दुपारी एकनाथ शिंदेनी थेट गुजरातमधून पत्रकार परिषद घेतली तर, त्यात शिंदे काय बोलतील व काय निर्णय असेल हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांच्या एका निर्णयामुळे संपूर्ण राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.