एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) झाले. त्यानंतर ते गेल्या महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारला एका मागे एक मोठे धक्के देत आहेत. त्यातच आता या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक मोठा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. या महापालिका निवडणुकीत (Election 2022) नवीन प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. पण आता प्रभाग रचना रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच २०१७ मध्ये प्रभाग रचनेनुसार निवडणुका झाल्या होत्या. यंदाही याच प्रभाग रचना घेऊन निवडणुका घेण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा आणखी एक मोठा धक्का आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडीची सत्ता असताना प्रभाग रचनेवरून राजकीय पक्षांमध्ये राजकारण पेटलं होतं. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. मात्र या प्रभाग रचनेमुळे मोठी राजकीय उलथापालथ झाली. काँग्रेस नेत्यांनी प्रभाग रचनेबाबत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. विशेष म्हणजे प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्यांनीही न्यायालयात धाव घेतली होती. यामुळे महाविकास आघाडी अपयशी ठरली आहे का? अशा चर्चा चालू झाल्या होत्या. शिवसेनेवर आपल्याच पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग निर्माण केल्याचा आरोप होत होता.
Uday Samant : घडलेल्या घटेनबद्दल सामंत यांनी ट्विट करत स्पष्ट शब्दात सुनावले
विशेष म्हणजे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काल राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबईतील प्रभाग रचनेबाबत चर्चा केली. त्यानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली.