31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी डोंबिवलीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड धरणे आंदोलनात सहभागी

डोंबिवलीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड धरणे आंदोलनात सहभागी

डोंबिवली ( शंकर जाधव ) याआधी नागपूर हे गुन्हेगारीच्या राज्यात अग्रेसर होते. आता डोंबिवलीने गुन्हेगारीत नागपूरला मागे टाकत आहे. सांकृतिक शहर म्हणून देशात नावजलेल्या या शहरात गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. येथील पोलीस यंत्रणा नक्की काय करतेय ? हे शहर भयमुक्त होण्यासाठी डोंबिवलीत मंगळवारी इंदिरा चौकात राष्ट्रवादी धरणे आंदोलन करणात आहे. या आंदोलनात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि विद्या चव्हाण यांसह बहुसंख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे प्रवक्ते महेश तपासे यांनी डोंबिवली घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यानंतरहि पोलीस यंत्रणेने आपले काम व्यवथित केले नाही तर राष्ट्रवादीकडून जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.

पत्रकार परिषदेत प्रवक्ते महेश तपासे, अॅड ब्रम्हा माळी, नंदू धुळे -मालवणकर, निरंजन भोसले,समीर गुधाटे,राजेंद्र नांदोस्कर,सुनिल फळदेसाई,सुरेय्या पटेल आणि आत्महत्या केलेले प्रल्हाद पाटील यांची पत्नी सपना पाटील आदि उपस्थित होते. यावेळी सपना पाटील म्हणल्या, माझे पतीचा अनेक वर्षापासून केबल व्यवसाय होता. मात्र त्यांना वारंवार मानसिक त्रास दिल्याने अनेक वेळेला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता तक्रार घेत नव्हते. अखेर भोपर गावतील संदीप माळी यांच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केली.आत्महत्या करण्याआधी पतीने व्हिडीओ काढून त्यांना कोण आणि किती त्रास देत होते हे सांगितले आहे. या व्हीडीओ पोलिसांकडे असूनआम्ही तक्रार दाखल केली. अद्याप त्यांना अटक झाली नाही. मला न्याय मिळावा राष्ट्रवादीकडे धाव घेतली.

यांनतर प्रवक्ते तपासे यांनी पोलीस तपास निपक्षपाती झाला पाहिजे अशी मागणी केली. ते पुढे म्हणाले, एका महिलेला न्याय मिळत नाही याचाही तरी या सरकारने विचार केला पाहिजे. याआधी नागपूर हे गुन्हेगारीत पुढे होते.मात्र आता डोंबिवलीतील घटना पाहता या शहराचे नाव पुढे येत आहे ये योग्य नाही. डोंबिवली शहरातील गुन्हेगारी थांबली पाहिजे. हे शहर भयमुक्त होण्यासाठी आणि नागरिकांना जागे करण्यासाठी डोंबिवलीत मंगळवार ४ तारखेला पूर्वेकडील इंदिरा चौकात राष्ट्रवादी अनेक कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन करणार आहे. या आंदोलनात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि विद्या चव्हाण हेही सहभागी होणार आहे.तर अॅड ब्रम्हा माळी म्हणाले, माझ्यावरही व्यायामशाळेत जीवघेणा हल्ला झाला होता त्याची सुधा तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.

सपना पाटील यांना पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी

सांडप गावातील महिला सपना पाटील यांच्या पतीने आत्महत्या केली. मात्र आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करूनही आरोपींना अटक करण्यात आली नाही. याला जबाबदारी असलेल्या आरोपींना पोलीस का अटक करत नाही हा आमच्या समोर प्रश्न आहे. त्यामुळे सपना पाटील यांना पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी करत असल्याचे पत्रकार परिषदेत प्रवक्ते तपासे यांनी केली.

पोलीस तक्रार दाखल घेत नसल्याचा आरोप

माझे पतीला मानसिक त्रास होत होता हे माझ्या डोळ्यांनी पहिले आहे. केबल व्यवसाय असल्याने पतीला त्रास दिला जात होता. आपल्याला मानसिक त्रास दिला असल्याची तक्रार वारंवार करण्यास पोलीस ठाण्यात ते गेले असता त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. अखेर माझ्या पतीने मानसिक त्रासला कंटाळून आत्महत्या केली. पोलीस असे का करत आहे हा माझ्यासमोर प्रश्न पडला आहे. माझी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे कि आरोपींना अटक करून मला न्याय द्या असे सपना पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »