डोंबिवली ( शंकर जाधव ) रविवारी पुकारलेल्या डोंबिवली बंदमध्ये पाच रिक्षांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या रिक्षाच्या मालकांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. बंदने सामान्य नागरिकांना त्रास झाला असून यात नागरिकांचा काय दोष आहे असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांनी पत्रकार परिषदेत केला. जबरदस्ती डोंबिवली बंद करून निषेधार्य आहे असे उपजिल्हाप्रमुख तात्या माने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत रिक्षाचालकांना आर्थिक मदत करण्यात आली.
पत्रकार परिषदेत उपजिल्हाप्रमुख तात्या माने, डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, शाखा प्रमुख राकेश राणे, संदीप नाईक, अजय घरत, आयरे गाव माजी विभाग प्रमुख हरीचंद्र पराडकर, उपविभाग प्रमुख काका तोडणकर, माजी शाखा प्रमुख राजेंद्र रेवनकर आदि उपस्थित होते.यावेळी शहरप्रमुख खामकर यांनी डोंबिवली बंद का पुकारण्यात आला होता असा प्रश्न उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, सुषमा अंधारे या त्यावेळी शिवसेनेत नव्हत्या. अंधारे यांचे त्यावेळेच्या भाषणाचे व्हिडीओ व्हायरल करून वेगळ वळण दिले जात आहे. या बंदचा गरिबांना नुकसान झाले असून यात गरिबांना काय दोष अशा प्रश्न उपस्थित केला. बंद करण्यात भाजपचे जास्त पुढे होती असा आरोपही खामकर यांनी यावेळी केला.असेच जर सुरु राहिले तर येत्या निवडणुकीत जनता `यापैकी कोणी नाही` ( नोटा ) ला जास्तीत जास्त मतदान करतील अशी शक्यता बोलताना व्यक्त केली. रविवारी महामोर्च्यात डोंबिवलीतून जास्त जास्त लोक जाऊ नये म्हणून बंद पुकारण्यात आला असल्याचेहि खामकर यांनी सांगितले.उपजिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र चालक मालक सेनेचे अध्यक्ष तात्या माने यांनी बंदचा निषेध बंद मध्ये सहभागी न झालेल्या रिक्षाचे नुकसान करून काय सध्या केले असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.यावर पोलीस यंत्रणा लक्ष देईल असेहि माने यांनी सांगितले. नुकसान झालेल्या रिक्षाच्या मालकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आर्थिक मदत केल्याचे शहरप्रमुख खामकर यांनी सांगितले.
धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो ज्या रिक्षावर लावलेला होता त्या रिक्षाचे बंदमध्ये नुकसान झाले. याचा शहरप्रमुख खामकर आणि उपजिल्हाप्रमुख माने यांनी निषेध केला.हे जे कोणी केले त्यांनी रिक्षावर फोटो पाहून तरी भान राखायला हवे होते.बंद मध्ये रिक्षाचे नुकसान करून गरिबांना का वेठीस धरले असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. नुकसान झालेल्या रिक्षांच्या चालकांना शिंदे गटातील नेत्यांनी शाखेत येऊन नुकसान भरपाई घेऊन जा असे सांगितले. एकीकडे रिक्षाचालकांच्या आपापसातील वादामुळे रिक्षांचे नुकसान झाले असा दावा करणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांनी मदत करून अप्रत्यक्षरित्या या बंदमध्ये रिक्षाचे नुकसान झाल्याचे कबूल केले का असा प्रश्न ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.