32 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
HomeKalyan-Dombivliमाजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वतीने द केरला स्टोरीचे मोफत शो संपन्न

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वतीने द केरला स्टोरीचे मोफत शो संपन्न

मुली व महिलांचा मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद

डोंबिवली (शंकर जाधव):- माजी आमदार नरेंद्र पवार व कल्याण विकास फाऊंडेशनच्या वतीने 18 ते 25 वयोगटातील युवतींकरिता “द केरला स्टोरी”या सत्य परीस्थितीवर आधारीत चित्रपटाचे मोफत सादरीकरण करण्यात आले. व “लव जिहाद” विरोधात जनजागृती करणे हा उद्देश यामागचा उद्देश होता. केरळ मधील अत्यंत विदारक वास्तव त्या सिनेमात दाखवण्यात आले आहे, त्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या अनुषंगाने कल्याण विकास फाउंडेशनच्या वतीने अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार यांनी पुढाकार घेत हा चित्रपट दाखवला. दरम्यान धर्मांतराला व लव जिहादला बळी पडणार नाही अशी शपथ देखील उपस्थीत महिला व मुलींनी घेतली.


द केरला स्टोरी हे वास्तववादी व केरळच्या हिंदू मुलींची लव जिहादच्या माध्यमातून कोणत्या प्रकारे शोषण करून त्यांना आपल्या कुटुंबापासून तोडण्याचे काम ही जिहादी प्रवृत्ती करते, व्यसनाधीन होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात तसेच धर्मपरिवर्तन करण्यासाठी व आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाते याचे वास्तववादी चित्रण या फिल्ममध्ये केले गेले आहे. विद्यार्थिनींनी, युवती व महिलांचे लव जिहाद पासून कसे वाचवता येईल यासाठी फक्त आरएसएस व हिंदू संघटनाच नव्हे तर सर्व हिंदू समाज एकत्रित येऊन यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी असे मत हेमलता नरेंद्र पवार म्हणाल्या. महाविद्यालयीन विद्यार्थीनीना व तरुणी यांना सनातनचे डॉ.उपेंद्र डहाके यांच्या माध्यमातून लव जिहाद एक षड्यंत्र हे पुस्तक वाटण्यात आले. भारत माता की जय, वंदे मातरम्, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्या घोषणांनी पूर्ण चित्रपटगृह दणाणून गेले होते.यावेळी कल्याण विकास फाऊंडेशनचे पदाधिकारी गणेश काळण, प्रविण हेंद्रे, कल्पेश जोशी, राहुल भोईर, सदा कोकणे, रुपचंद राठोड, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा ज्ञानेश्वर पवार, समृद्धी देशपांडे, मनिषा केळकर, प्रिती दिक्षित, जयश्री देशपांडे, रत्ना कुलथे ल, हिंदू युवा मंचचे विवेक गायकर आणि पदाधिकारी व इस्कॉनचे सर्व मान्यवर व आदी कार्यकर्ते उपस्थित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »