डोंबिवली ( शंकर जाधव )
आगरी समाजाचे नेते व निऴजे येथील संकल्प बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक वसंत पाटील यांना गजानन पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने गुरूवारी सन्मानित करण्यात आले. कोन येथील गजाननराव पाटील महाविद्यालयात पुरस्कार सोहळा पार पडला.
सामाजिक कार्याची आवड असलेले पाटील यांनी अनेक सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत. काटई येथील यशवंत विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असतांना 1972 मध्येच ठाकुर्ली जिल्हा परिषदेत मतदारसंघातून ठाणे जिल्हा परिषदेवर निवडून आले. ते 1972 ते 79 दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सदस्य, प्रतोद म्हणून त्यांनी काम केले. निळजे येथे संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना व संचालन संस्थेमार्फत सर्वोदय, रवींद्रनाथ टागोर न्यू इंग्लीश स्कूल, सुमनताई वसंत पाटील ज्युनियर कॉलेजची स्थापना त्यांनी केली. या संस्थेमार्फत अनेक समाजाभिमुख उपक्रम त्यांनी राबविले. सर्वपक्षीय ग्रामीण विकास संघर्ष समितीच्या आंदोलनाचे संस्थापक सरचिटणीस म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यातूनच पुढे कल्याण -डोंबिवली महापालिकेतून मुक्त झालेल्या 27 गावांमधील युवकांना नेतृत्व करण्ाची संधी मिळाली. गावातील विकासकामांमधून रोजगार मिळाला. मात्र पुन्हा या ग्रामपंचायतींचा समावेश महापालिकेत झाल्यावर ग्रामपंचायतील नोकरीस असलेल्या युवकांना कल्याण – डोंबिवली महापालिकेत कायम रोजगाराची संधीही त्यांच्यामुळेच मिळू शकली.
या 27 गावांच्या गुरचरण जमिनीत बोरिवलीतील झोपडपट्टी धारकांचे स्थलांतर करण्याचा घाट शासनाने घाचला, शासनाला हा निर्णय रद्द करण्यासाठी गायरान बचाव समितीचे प्रमुख सल्लागार म्हणून त्यांनी भूमिका बजावली. नांदिवली येथील पिंपळेश्वर मंिदरावर कब्जा केलेल्या वरिष्ठ अधिकार्याविरोधातही आंदोलन यशस्वी करून गावकर्यांना त्यांनी त्यांचा हक्क मिळवून दिला.
पाटील हे डोंबिवली येथी ठाणे जिल्हा आगार शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगती कॉलेजच्या स्थापनेपासून विश्वस्त सभासद आहेत. निळजे परिसरातील गरजूंसाठी विनामूल्य मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व चष्मे वाटप रोटरी ग्रामीण मंडळाच्या मार्फत राबविले. अनेक दिव्यांगांना विनामूल्य कुबड्या व तीन चाकी सायकल त्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. जिल्ह्यातील दधिची देहदान मंडळाच्या कार्यातही त्यांचा सक्रीय सहभाग आहे. निळजे व परिसरातील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कल्याण – डोंबिवली महापालिकेला दवाखन्यासाठी अर्धवेळ जागा मिळवून दिली. पाटील हे परिसरातील सामाजिक, शैेक्षणिक व सांस्कृतिक कार्यात सदैव हिरीरीने पुढाकार घेतात.