जुलै महिन्याच्या पहिल्याच तारखेला देशातील प्रमुख गॅस कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) च्या किमती कपात केल्या आहेत. व्यायवसायिक गॅस सिलेंडरच्या दारात प्रति सिलेंडर १९८ रुपये इतकी कपात झाली तर दुसरीकडे १४.२ किलोग्रॅम च्या घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक सिलेंडरच्याच्या किमती कपात झाल्यावर दर आता २०२१ रुपयांवर पोहोचले आहेत. या पूर्वी सिलेंडर चे भाव २,२१९ रुपये होते.
जून महिन्यातसुद्धा सिलेंडर चे दर कमी केले होते. जून महिन्यात १३६ रुपयांची कपात करून पुन्हा जुलै महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडर च्या किमती कपात केल्याने हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा परिणाम आता हॉटेलमधील मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमतीत होण्याची शक्यता आहे.
नव्या दराप्रमाणे दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅसची किंमत २,०२१ तर कोलकाता येथे २,१४० रुपये असे दर झाले आहेत. मुंबई येथे व्यावसायिक गॅस सिलेंडर ची किंमत १,९८१ रुपये इतकी आहे. चेन्नईमध्ये २,१८६ रुपये इतके गॅस ची किंमत कपात झाली असून ती पूर्वी २,३७३ इतकी होती.
दरम्यान, नवीन गॅस कनेक्शन घेणेही महाग झाले आहे. जर तुम्हाला नवीन व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी कनेक्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील. गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडर कनेक्शनच्या किमतीत प्रति कनेक्शन 1,050 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे कनेक्शन 2,550 रुपयांना मिळत होते. ती आता 3,600 रुपये झाली आहे. दुसरीकडे, गेल्या दोन महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. गॅसच्या दरात घसरण झाल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थही काहीसे स्वस्त होण्याची शक्यता आहे.