डोंबिवली (शंकर जाधव) ७५व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिना निमित्त ‘घरो घरी तिरंगा’ अभियनातर्गत डोंबिवलीत गतिमंद मुलांनी रॅली काढली. डोंबिवलीतील क्षितिज संचालित क्षितिज मतिमंद मुलांच्या शाळा (ठाकूरवाडी) येथून सम्राट हॉटेल येथे पुन्हा शाळेत अशी रॅली निघाली होती. रॅलीत पालकवर्ग आणि काही नागरिकही सहभागी झाले होते. गतिमंद मुलांनी तिरंगा घेऊ न ‘भारत माता की जय’ असे म्हणत देशप्रेम व्यक्त केले.
आदर्श मस्के, सेजल जेसवाल, महर्ष नाडकर्णी, सूरज साळवी, गणेश दुलेऱा,आदित्य अय्यर, आर्यन चव्हाण, श्रद्धा पवार तृप्ती बनकर,स्वराज माने.या मुलांनी शिक्षकांच्या मदतीने डाळी, कडधान्ये तांदूळ , क्राफ्ट चे साहित्य, कागदी फुले, कोलाज,यांचा वापर करून शाळेच्या बाहेर रांगोळी काढली होती.संस्थेच्या संचालिका आरती दळवी यांसह शिक्षकवर्ग आणि पालकवर्ग उपस्थित होते.