डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा, नविन देवीचा पाडा, स्मशानभूमी परिसर, गरिबाचा वाडा, उमेश नगर, जगदंबा मंदिर परिसर कलावती आई मंदिर परिसर, गोपीनाथ चौक या परिसरातील पाण्याची वेळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. या परिसरातील लोकसंख्या वाढत आहे. पाण्याच्या समस्येमुळे गेली दोन ते अडीच वर्षे या परिसातील नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात झीनींग पद्धतीने पाण्याची लाईन टाकण्यात आली आहे. या लाईनला आठ दिवसात सर्व पाण्याचे कनेक्शन जोडण्यात आले नाही, पाणी समस्या दूर न झाल्यास विभागातील नागरिकांना घेऊन पालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी दिला आहे.