कोरोनानंतर आता सर्वच क्षेत्र आपापल्या कामामध्ये सुरळीत होण्याचा प्रयत्न करत आहेत. चित्रपटसृष्टी मोठ्या ताकदीने कामाला लागली असली तरी, नाट्यसृष्टीही आपल्या पद्धतीने धडपड करतच आहे. सर्व एकांकिका स्पर्धा, दौरे याचे आयोजन आता बिनधास्त केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर श्री कलामंच, डोंबिवली यांनी थेट गोव्यामध्ये जाऊन गिरवडे या गावी सातेरी देवीच्या चरणी आपल्या कलेची सेवा दिली. दिनेश मोरे दिग्दर्शित नाटक करतंय गाव या नाटकाचा सुंदर असा प्रयोग पार पडला.
धम्माल विनोदी असलेल्या या नाटकामध्ये कुणाल मोरे, रोशन मोरे, रोहन मोरे, ऋतुजा आयरे, रिद्धी मोरे, सिध्देश नलावडे, रोहित आयरे, विक्रांत नलावडे आणि हास्यजत्रा फेम अभिजित पवार यांनी वेगवेगळ्या भूमिका सादर केल्या. तसेच साहिल मोरे, अहाना घोसाळकर, मनाली मोरे, संकल्प गडेकर यांनी रंगमंच व्यवस्था पूर्णपणे हाताळली. रात्री उशिरा सुरु झालेल्या या प्रयोगाला लोकांचा तुफान प्रतिसाद लाभला. या नाटकाचे आयोजन संजय गडेकर यांनी केले होते. गिरवडे बादेर्श येथील श्री भूमिका सातेरी देवस्थानचा ५४ वा वर्धापनदिन सोहळा हे या कार्यक्रमाचे निमित्त होते.