सध्या देशभरात ईडी प्रत्येक ठिकाणी छापे टाकत आहे. त्यामुळे नेते व सर्वसामान्यांसह ईडीचा (Enforcement Directorate) धसका सर्वांनीच घेतला आहे. संजय राऊत,अर्पिता मुखर्जी यांच्यासह सध्या अनेक व्यापारींवर कारवाई सुरु आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे बेहिशोबी मालमत्ता किंवा मोठ्या प्रमाणात मौल्यवान दागिने (Gold at home) सापडल्यास ईडीची कारवाई होते. ईडीच्या भीतीने अनेक लोक गूगलवर घरात सोने व पैसे ठेवण्याची मर्यादा तपासत आहेत. घरात किती मालमत्ता किंवा सोने ठेवावे याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
देशातील सुवर्ण नियंत्रण कायदा जरी जुना झाला असला तरी घरात किती सोने ठेवावे याची मर्यादा आखून ठेवलेली आहे. घरात मर्यादेपेक्षा जास्त सोनं असल्यास ईडीची धाड पडू शकते. केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाने यावर एक पत्रक जाहीर केले आहे. या पत्रकानुसार घरात किती रक्कम ठेवावी याला मर्यादा नाही परंतु ती रक्कत कुठून आली, त्याचा मूळ स्रोत काय याची माहिती तुम्हाला द्यावी लागेल. चौकशी झाल्यास याबाबत उत्तरे तुम्हाला देणे आवश्यक आहे. तसेच कागदोपत्री पुरावे देखील सादर करणे गरजेचे आहे. तुमच्या उत्पादनापेक्षा जास्त रक्कम तुमच्याकडे सापडल्यास तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तुमच्यावर कारवाई होऊ शकते. काही प्रकरणात ५० ते १०० टक्के दंड वसूल केला जाऊ शकतो.
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीत बिघाड,डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला
सोन्याच्या बाबतीत म्हंटलं तर त्याबाबत काही वेगळे नियम व मर्यादा आहेत. प्राप्तिकर खात्याने काही मर्यादा घालून दिल्या आहेत. नियमानुसार एका विवाहित स्त्रीला घरामध्ये ५०० ग्रॅम सोन्याचे दागिने ठेवता येतील तर अविवाहित महिलेला केवळ २५० ग्रॅम सोनं बाळगता येऊ शकते. पुरुषांच्या बाबतीत हे नियम वेगळे आहेत. पुरुष अविवाहित असो किंवा विवाहित त्याला १०० ग्रॅमपेक्षा जास्त सोने जवळ ठेवता येणार नाही. इनकम टॅक्सची धाड पडल्यास या पेक्षा जास्त सोने सापडले तर ते जप्त होऊ शकते.
दुसऱ्या व्यक्तीची मालमत्ता किंवा सोने जर तुम्ही तुमच्या घरात ठेवले असेल व धाड पडली तर त्याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.