डोंबिवली ( शंकर जाधव )
इंस्टाग्रामवरील ओळखीचा फायदा घेत नवीन दुचाकी वाहन चोरी केल्याची घटना डोंबिवलीत घडली.या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम वरून ओळख झाल्यानंतर अनिकेतने डोंबिवलीत राहणारे फिर्यादी करण सागवेकर यांना ठाकुर्ली रेल्वेस्टेशन जवळ भेटण्याचे ठरले.ठरलेल्या ठिकाणी करण आपली नवीन दुचाकी घेऊन आले.अनिकेतने करणला बोलण्यात गुंतवून तुझी नवीन गाडी चालवून बघतो असे सांगून रपेट मारायला गाडी घेऊन गेल.करणने खूप वेळ वाट पाहिली , मात्र अनिकेत परत न आल्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही कॅमेराचा आधार घेत कल्याण परिसरातून सापळा रचून अनिकेला अटक केली.
अनिकेतने ठाणे शहरातील कोपरी आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील दुचाकी चोरी केल्याने त्याच्या वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे आरोपी अनिकेत वाडकर हा फिरस्ता आहे. पुढील तपास पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक भराडे करत आहेत.