डोंबिवली (शंकर जाधव)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे मार्गी जलवाहतूक बोटीने प्रवास करून मोठेगाव डोंबिवलीत आले. शिंदे गटाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दीपेश म्हात्रे फाउंडेशन अंतर्गत् भव्य दहीहंडी आयोजन केले होते. डोंबिवली पश्चिम येथे सम्राट चौक येथील उत्सवाला रात्री साडे अकरा वाजता हजेरी लावली. भर पावसात गोविदा पथके आणी तमाम डोंबिवलीकर मुख्यमंत्र्याची भर पावसात वाट पाहत होते. गोविंदा पथक खेळाडू याच्या साठी ह्या वर्षी पासून खेळाचा दर्जा देऊन दहा लाखाचा विमा ही जाहीर केला आहे. सार्वजनिक सुट्टी जाहीर करून खेळाडू ना शासकीय नोकऱ्यात पाच टक्के आरक्षण ही राज्य शासन् देणार आहे अस मत आज पत्रकारांशी व जनतेशी संवाद त्यांनी साधला तर मी फक्त मुख्यमंत्री नसून प्रत्येक नागरिक इथे मुख्यमंत्री आहे हे आपल सरकर आहे सर्व सामान्य माणसा च सरकार आहे अशी भावनिक साद ही घातली.
लवकरच कल्याण डोंबिवली चे प्रश्न सोडविण्यासाठी मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र भेटून इथे येऊन समस्स्या सोडविण्याचे आश्वासन ही मुख्यमंत्र्यांनी पत्रकाराशी बोलताना केले.