राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या निमित्ताने एक खुशखबर आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी मिळणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी येत असल्याने त्यापूर्वीच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा निर्णय राज्यातील शिंदे सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन 21 तारखेला दिवाळीपूर्वी अदा करण्याचे आदेश सर्व आस्थापनांना देण्यात आले आहेत. अशी मागणी यापूर्वीही कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.