डोंबिवली (शंकर जाधव)
रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत गुरुवारी डोंबिवली वाहतूक उपविभाग व एम्स हॉस्पिटल, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक पोलीस व रिक्षा चालक यांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. शिबिराचे उदघाटन सहायक पोलीस आयुक्त ( डोंबिवली विभाग ) सुनील कुराडे यांचे हस्ते करण्यात आले.
विद्या चव्हाण यांचा खासदार डॉ.शिंदेंना टोला
या कार्यक्रमास डॉ. मिलिंद शिरोडकर, लेखक शुक्राचार्य गायकवाड, वपोनि सचिन सांडभोर, क्राईम पेट्रोल मालिकेतील कलाकार सतीश नायकवाडी, सेफ्टी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेटे, ए एसजीआय हॉस्पिटल (डोंबिवली) हरी पिल्लाई, ऍड. शिरीष देशपांडे व पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिक हजर होते.
मुंबई विभागीय क्रिकेट स्पर्धेत डोंबिवलीचा संघ सरस
यावेळी सर्व उपस्थिताना वाहतूक शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी सुप्रिया कुलकर्णी यांनी सांभाळली.