33 C
Mumbai
Sunday, April 9, 2023
Homeआरोग्यMonkeyPox variant : मन्कीपॉक्सचा वाढता धोका! संसर्गित लोकांना घ्यावी लागणार ही...

MonkeyPox variant : मन्कीपॉक्सचा वाढता धोका! संसर्गित लोकांना घ्यावी लागणार ही महत्वाची काळजी

देशात मांकीपॉक्सची (Monkeypox) वाढती प्रकरणे लक्षात घेऊन केंद्र सरकारने (Cabinet ministry) आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये २१ दिवसांचे विलगीकरण, जखमा झाकणे आणि ट्रिपल लेयर मास्क (Triple layer mask) घालणे यांचा समावेश आहे. याशिवाय मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी चाचणी किट (Kit) आणि लस (Vaccine) तयार करण्यासाठी सरकारने निविदा काढल्या आहेत. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे ४ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी केरळमध्ये (Kerala) ३ तर दिल्लीत (Delhi) १ रुग्ण आढळून आला आहे. आतापर्यंत ४ संशयास्पद प्रकरणेही समोर आली आहेत. सर्व नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले आहेत.

  • मंकीपॉक्स बाधित रुग्णाला २१ दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल.
  • फेस मास्क घालण्यासोबतच सतत हात धूत राहा. 
  • तीन थरांच्या मास्कचा वापर करा.
  • जखमा पूर्णपणे झाकून ठेवाव्यात. 
  • आजार पूर्णपणे बरा होईपर्यंत रुग्णाला रुग्णालयातच राहावे लागणार आहे.
  • रुग्णालयातील वॉर्डमध्ये दाखल झालेल्या संक्रमित रुग्णाच्या किंवा संशयित रुग्णाच्या कोणत्याही दूषित सामग्रीच्या संपर्कात आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही लक्षणे दिसून आल्याशिवाय कर्तव्याबाहेर जाता येणार नाही. अशा आरोग्य कर्मचार्‍यांवर २१ दिवस देखरेख ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.
  • मंकीपॉक्स रुग्णाच्या संपर्कात आल्याने, त्याच्याशी शारीरिक संबंध आल्याने किंवा कपडे, अंथरूण इत्यादी दूषित वस्तूंच्या संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो. हे टाळणे अत्यंत गरजेचे आहे.

मंकीपॉक्सचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे. केंद्राने लस निर्मात्या कंपन्यांना मंकीपॉक्ससाठी प्रथम डायग्नोस्टिक किट तयार करण्यास सांगितले आहे, जेणेकरून रोग लवकर आणि अचूकपणे शोधता येईल. 

मंकीपॉक्सचा भारतात शिरकाव, ‘या’ महत्वाच्या राज्यांमध्ये सापडले रुग्ण

Monkeypoxmeter.com च्या आकडेवारीनुसार, भारतासह ८० देशांमध्ये २०,७१० रुग्णांची पुष्टी झाली आहे. यापैकी युरोपमध्ये सुमारे १२ हजार लोक मंकीपॉक्सच्या संसर्गात आले आहेत. त्याचवेळी, या रोगाने सर्वाधिक प्रभावित १० देशांमध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम यांचा समावेश आहे. यावर्षी मंकीपॉक्सने ३ जणांचा बळी घेतला आहे.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की हा रोग रुग्णाच्या त्वचेपासून त्वचेच्या संपर्कात किंवा त्याचे अन्न खाल्ल्याने देखील पसरतो. याशिवाय संक्रमित व्यक्तीचे कपडे, भांडी आणि बिछान्याला स्पर्श केल्यानेही मंकीपॉक्स पसरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »