29 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeताजी बातमी उन्हाचा तडाखा पक्ष्यांना घातक

उन्हाचा तडाखा पक्ष्यांना घातक

डोंबिवली (शंकर जाधव)

42℃ पर्यंत तपमानात पशु पक्ष्यांना देखील त्रास होतो.साधारण पणे सर्व पक्षी सकाळी आणि संध्याकाळी घरट्या बाहेर पडून अन्न शोधतात आणि मग परत घरट्यात जातात. परंतु काही पक्षी जसे घार, कबुतर आणि कावळे जे दुपारी सुद्धा खाद्य शोधत असतात. अश्यावेळी त्यांना उष्माघात होण्याची शक्यता असते.

असाच एक कॉल पॉज ला परवा आलेला की एक घार निपचीत पडली आहे. पॉज संस्थेचे देवेंद्र निलाखे आणि जयश्री काळे ह्यांनी त्या घारीला वाचवून तिच्यावर उपचार केले व तिला 48 तासांत तरतरीत करून उडवून देखील लावले.

दरवर्षी पॉज संस्था अश्या अनेक पशु पक्ष्यांना जीवनदान देते व संस्थेच्या प्रवीण स्वयंसेवकांकडून त्यांना निसर्गात मुक्त करत असते असे संस्थेचे संस्थापक निलेश भणगे ह्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »