31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी महाराष्ट्रामधील या भागात पुढील दिवस धोक्याचे

महाराष्ट्रामधील या भागात पुढील दिवस धोक्याचे

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

मच्छिमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर जाऊ नये असे प्रादेशिक हवामान खात्याने म्हटले आहे. ४ जुलैच्या मध्यरात्री मालवण ते वसई किनारपट्टीपर्यंत ३.५ ते ४.८ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

मुंबई लोकल चे पावसामुळे रडगाणे सुरूच… 

उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नंदुरबार, नाशिक आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय ५ ते ७ जुलै रोजी जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने मध्यम ते मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »